Saturday, November 6, 2010

का असावे एवढे विविध सण....??

का मनवावा दिव्यांचा  सण...
का असावे  लक्ष्मीपूजन  ...
का साजरे  करावा  भाउबीजेचा सण...
का असावे  एवढे  विविध  सण....


का खेळावा  गुडीचा  हा  खेळ ..
का घालावा  २१  मोदकांचा  मेळ ..
का साजरे  करावा   रावणाचा   मृत्यूशी  मेळ ..
का असावे  एवढे  भातुकलीचे  खेळ ...

का असावा  रंगांचा  खेळ ...
का वाटावी  तिळांची   भेळ ...
का पाहावे  गौरीचे  खेळ ...
का मांडावे   विविध  हे  खेळ ...

का होते  आमचे  पूर्वज  वेडे ...
का नव्हती   त्यांना  इतर  कामे ...
का नव्हते   त्यांना  दुसरे  काही  कोडे ..
का घालवी  ते  एवढा  वेळ  सणामागे....

हा प्रश्न आला तर वावगे असे नाही
तो अनुत्तरीत राहिला तर ते योग्य नाही
प्रत्येक सणाचा होता काही उद्देश्य
सगळ्यांनी एकत्र नांदावे हा भावार्थ ...

-नालायक पोरगा

3 comments:

  1. wah wah..changli kavita aahe...he sagale san bayakanna shopping karayala milvali mhanun suru kelele aahet :D

    ReplyDelete
  2. For those who might not have understood properly...
    2nd last para is a sarcastic one...
    last 2 lines of poem ... answer all the questions..

    ReplyDelete
  3. please release the hindi version also!!!

    ReplyDelete