Sunday, November 13, 2011

प्रगती ....

बाळाच्या जन्मासाठी सृष्टीचे नियम पाळले जात
आता मात्र फक्त कात्री लावतात
तेव्हा बाळ देवाची कृपा असे
आता मात्र वेळाची कृपा आहे !!

बाळाची हक्काची साथीदार आई
आता मात्र साथीदार काम वाली बाई
खाण्यासाठी आई खाऊ माऊ करे
आता मात्र दुकानाकडे धावे !!

बापाकडे पोरासाठी नेहमी असे वेळ
आता मात्र वेळ मारी, देऊन विविध खेळ
बापाचा शब्द म्हणजे दगडावरची काळी रेघ
आता मात्र शब्द म्हणजे Paint मधील एक रेघ !!

माय बाप देई पोरांना Quality time
आता मात्र Hotel Quality मध्ये dine
माय बाप देई पोराला जीवनाचे धडे
आता ते स्वतः धड इकडे ना तिकडे !!


लोक म्हणतात झालो आपण प्रगत
Nuclear आहे family, आहे सुकर जीवन
मला मात्र प्रश्न एकच पडतो
कुठे आहे Nucleus आणि कुठे आहे Family !!

(This one is a take on how we as a society are transiting from 'our'  to western. )
- नालायक पोरगा

2 comments:

  1. Good effort..

    Just a small suggestion..

    Every poem you write need not have rhymes... that restricts the choice of words...

    There are different styles for writing poems and conveying the true message..

    ReplyDelete