Sunday, February 2, 2014

वाह रे Success !!

आपले आहेत हे सगळे मित्र,
सगळे आहेत भिन्न आणि विचित्र,
सगळ्यांना आहे प्राप्त सुख ?
पण सगळे  का वाटत आहेत  जणू अतृप्त ….

पहिला आहे वकील, रोज जिंकतो CASE,
आहे तो नामवंत, कमवतो पण अनंत,
पण त्याने केली एक गफलत, लग्नाला पण समजला एक केस,
रात्री घरी "वकील" येई, बायको मात्र "नवरा" शोधे अंतरात,
शेवटी झाला निकल, त्याला मिळालीच अजून एक CASE…

दुसरा आहे IITian, रोज जोडतो अनेक Machines
आहे तो नामवंत, कमवतो पण अनंत,
पण त्याने केली एक गफलत,  नाही जुळवता आली त्याला लग्नाची Machine
रात्री घरी एक "Egoistic" येई, बायको मात्र "नवरा" शोधे अंतरात,
शेवटी बायको झाली "Tune", त्याला मिळालीच अजून एक Machine

तिसरा आहे MBA, रोज बनवतो  विविध Customers,
आहे तो नामवंत, कमवतो पण अनंत,
पण त्याने केली एक गफलत, नाही कळली त्याला Customer Requirement,
 रात्री घरी "Social Drinker" येई, बायको मात्र "नवरा" शोधे अंतरात,
 शेवटी बायको झाली शांत, त्याला मिळालाच एक "शांत" Customer…

- नालायक पोरगा

No comments:

Post a Comment