Sunday, April 1, 2012

जाईच्या फुला कळला का तुला...

जाईच्या फुला कळला का तुला, हळूच कुणी उठवील का ...
 डोईवर तुरा  पायात वाळा, अंगणी मोर नाचायला आला...
थांबरे मोर नाचू नको,बाळाची गाई मोडू नको...
रागाला आला मोर रागाला आला, थुई थुई नाचून निघून गेला...

जाईच्या फुला कळला का तुला, हळूच कुणी उठवील का ...
बाळाशी खेळायला चिऊ ताई आली, झाडावर बसूनी  चिवचिवली...
थांबग चिऊ ओरडू नको, बाळाची गाई मोडू नको...
रागाला आली चिऊ रागाला आली, चिव चिव ओरडून निघून गेली...

जाईच्या फुला कळला का तुला, हळूच कुणी उठवील का ...
बाळाशी खेळायला हम्मा  आली, अंगणी येऊन हंबरली...
थांबग हम्मा हमरू नको, बाळाची गाई मोडू नको...
रागाला आली हम्मा रागाला आली, गावात चारा खाऊन गेली...

जाईच्या फुला कळला का तुला, हळूच कुणी उठवील का ...
बाळाशी खेळायला वारे दादा आला , पाळण्या भोवती घुम घुमला...
थांबरे  वाऱ्या वाहू नको, बाळाची गाई मोडू नको...
वाऱ्याने बाळाशी मस्ती केली, बाळाची गाई उडून गेली...

जाईच्या फुला कळला का तुला, हळूच कुणी उठवील का ...

-Anonymous
(माझ्या लहानपाणीचे अंगाई गीत)

No comments:

Post a Comment